विष्णुसहस्रनाममधील ९ वे नाव भूतभावन :
हरिः 🕉️विष्णुसहस्रनाममधील ९ वे नाव " भूतभावन : २१|४|२१" चैत्र शु.९ " श्रीराम नवमी " राम जन्म. " " भूतभावन ": =प्राणिमात्रांची उत्पत्ती व वृद्धी करणारा. "भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा:"|गीता१०|५ जीवांचे चांगले-वाईट विविध गुणधर्म भगवंतांनीच निर्माण केले आहेत. या सर्व भावांच्या मुळाशी मीच आहे संसारात ज्या काही घटना क्रिया ( चांगल्या वाईट ) ते भगवंताचे रूप आहे .आज राम नवमी. श्रीरामांच्या लिलेत बालकांड,अयोध्या कांड ,अरण्यकांड, लंकाकाण्ड, आहे. पुरीत राहिले म्हणून अयोध्या पुरीत भगवंताचं प्राकट्य आहे. "स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम |भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ||"गीता १०|१५. राजा राणी प्रजेचा वात्सल्य भाव आहे. भक्त, ऋषी ,राक्षस, तापसी, विद्वान सर्वांच्या भेटी आहेत. त्यानुसार आचरण ह्या सर्व लिला आहेत ही भगवंताची अनेक रूपे आहेत. जे जे भेटे भूत | ते ते जाणिजे भगवंत || असा हा " भूतभावन : " विष्णु.
||हरिः ॐ||सौ.शुभदा शरद काणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा